मुंबईत रविवारची रात्र थंडीची

देशभरात थंडीचे वारे वाहू लागले असून मुंबईतसुद्धा गारवा जाणवायला लागला आहे. राज्यात शनिवार, रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईतील तापमानात मोठी घसरण झाली आहे.
मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडीचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत अकाळी पाऊस पडल्यामुळे तापामानात कमालीची घट झाली आहे.
राज्यात मध्यरात्री पावसाच्या सरी
महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये रविवारी मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारावा वाढला आहे. हवामान खात्याने २२ आणि २३ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.
धुळ्यात तापमान ६.८ अंशावर
धुळे जिल्ह्यात तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा खाली येत आहे. जिल्ह्यामध्ये ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Hello, I found this blog via google, just thought you might want to know!