Sat. Oct 31st, 2020

आश्चर्य! मुंबईच्या समुद्रात हा अनोखा मासा कसा आला?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमधल्या मासळी बाजारात एका मच्छी विक्रेत्याकडे एक अनोखा मासा सापडला आहे.

 

सनफिश असं या माशाचं नाव असून मच्छीमारांना मासेमारी करताना वसईच्या समुद्रात हा मासा आढळला. या माशाचं वजन अडीच किलो आहे.

 

सनफिश हा मासा मुंबई जवळच्या समुद्रात आढळत नसल्याने तज्ज्ञांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं. तर क्रॉफर्ड मार्केटमधल्या या माशाने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *