Tue. Oct 27th, 2020

ट्रेनची चेन खेचल्याबद्दल सनी आणि करिश्मावर आरोप निश्चित

अभिनेता आणि वर्तमान खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर ट्रेनची चेन खेचल्याप्रकरणी कोर्टाने आरोप निश्चित केला आहे. 1997 च्या ‘बजरंग’ या चित्रपटा शुटिंगदरम्यान रेल्वे प्रशासनाची परवानगी न घेता हे चित्रीकरण झालं होतं. रेल्वेच्या संपत्तीचा गैरवापर केल्याचे त्यांच्यावर आरोप होते. न्यायालयाने हे आरोप निश्चित केले आहेत.

काय आहे प्रकरण ?

‘बजरंग’ या चित्रपटाचे चित्रीकरण जयपूर मधील फुलेरा रेल्वे स्टेशनजवळ एका एक्सप्रेसमध्ये सुरू होतं.

त्यावेळी  सनी देओल आणि करिश्मा कपूर यांनी ट्रेनची चेन ओढली.

हे शुटिंग विनापरवाना झालं होतं.

ट्रेनला तिच्या निश्चित स्थळी पोहचायला 25 मिनीटे उशीर झाल्याने रेल्वे प्रशासनाने सनी देओल आणि करिश्मा कपूर यांच्यासह सतीश शाह व टिनू आनंद यांच्यावर खटला दाखल केला होता.

त्याप्रमाणे कोर्टाने सर्व आरोपींना नोटीस पाठवली होती.

आता या  खटल्याचे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहे.

या कोर्टाच्या निर्णयाबद्दल सनी देओल आणि करिश्मा कपूरने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 24 सप्टेंबरला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *