Mon. Nov 30th, 2020

अभिनेता सनी देओल बेपत्ता,हँडपम्प उखडण्यासाठी पाकिस्तानात?

अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल गेले अनेक दिवस गुरदासपूर मतदारसंघातून गायब असल्याचं विरोधी पक्षांच म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी ते थेट बेपत्ता असल्याची पोस्टर्सच मतदारसंघात लावली आहेत. ही पोस्टर्स सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहेत.

गेल्या अनेक दिवसांत सनी देओल यांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला नाही, अशी टिका विरोधी पक्षाने केली आहे. त्यामुळे सन्नी पाजी बेपत्ताच झाले असल्याची पोस्टर्स त्यांनी ठीकठिकाणी लावली आहेत. या पोस्टर्समुळे सनीदेओल नेटवर चांगलाच ट्रोल होतोय. Twitter वर लोक त्यावर एकाहून एक धमाल प्रतिक्रिया देत आहेत.

गेला सनी देओल कुणीकडे?

सनी देओल भाजपचा उमेदवार म्हणून गुरदासपूरमधून निवडून आला. मात्र खासदार झाल्यापासून सनी देओल मतदारसंघात फिरकलाच नाही अशी टीका होतेय. म्ग सनी देओल गेला कुठे, या प्रश्नावर नेटिझन्सनी धमाल उत्तरं दिली आहेत.

‘सनी पाजीला पाकिस्तानमध्ये शोधा, तिथे हँडपंप उखड्यासाठी गेले असावा’ अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने दिली आहे.

तर काहींनी फक्त ‘फेस व्हॅल्यू’ असल्यावर सगळी काम होतात असा भाजपचा गैरसमज असल्यामुळे सनी देओल न येताच सर्व कामं होतील असं वाटत असेल असा टोला लगावला आहे.

12 जानेवारी रोजी ‘नॅशनल युथ डे’ निमित्त नागपूर मध्ये खासदार क्रीडा मोहत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत खासदार सनी देओल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *