हृतिकचा ‘सुपर 30’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला

बाॅलिवूड स्टार ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ हा 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून या चित्रपटात ऋतिक रोशन आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका साकारणार आहे.
कधी रिलीज होणार ‘सुपर ३०’?
बऱ्याच दिवसांपासून ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.
या चित्रपटाच्या तारखांमध्ये सारखे बदल होत होते. पण हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या रिलीजची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी रिलीज होणार आहे.
हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे.या चित्रपटात ऋतिक रोशन आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटातून आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रवास दाखविण्यात येणार आहे.या चित्रपटातील एक पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे..