Mon. Sep 28th, 2020

दिल्लीमध्ये कारसाठी ‘हम दो हमारे दो’ लागू करा -सर्वोच्च न्यायालय

एका कुटुंबामागे एकापेक्षा अधिक गाड्या सर्रास वापरल्या जातात. प्रदूषणाची समस्या ही दिल्लीतील गाड्यांच्या वाढत्या वापराने अधिकच वाढत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कुटूंबनियोजनाप्रमाणे ‘हम दो हमारे दो’ या  धोरणाचा गाड्यांच्या बाबतीतही अवलंब करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. कारच्या वाढत्या वापराविरोधात या कडक निर्बंधाचा फायदा होईल का हे पाहावं लागेल.

नियमाची का गरज आहे?

दिल्ली शहरातील प्रदुषणाची समस्या अधिकच गंभीर होतेय.

दिल्लीतील वाढत्या गाड्यांच्या वापराने प्रदुषणामध्ये अधिकच भर पडताना दिसत आहे.

याला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका कुटुंबामागे दोन गाड्यांची मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षागणिक कारच्या वापराचा आलेख हा चढत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

कार वापरणा-यांच्या संख्येमध्ये जवळपास 17 लाखांची भर पडत आहे.

यामुळे कारपार्किंगचा प्रश्नही उद्भवत असल्याने यातून होणा-या हिंसाचारामध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

या सगळ्याचा विचार करता कारसाठी कुटुंबनियोजनाप्रमाणे ‘हम दो हमारे दो’ चा वापर करण्याचे आदेश दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *