Rafale Deal: पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट सकारात्मक

बहूचर्चीत विमान राफेल कराराप्रकरणी मोदी सरकारची चौकशी करण्यात यावी आशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
यावर मोदी सरकारला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली.
मात्र या विरोधात सुप्रीम कोर्टात प्रशांत भूषण आणि इतर दोघांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
या पुनर्विचार याचिकेवर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कोर्टाने दिले आहे.
काय झाले अगोदरच्या सुनावणीत ?
फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.
सुप्रीम कोर्टामध्ये 14 डिसेंबर रोजी राफेल प्रकरणावर सुनावणी झाली होती.
या सुनावणीत कोर्टाने चौकशीची मागणी फेटाळली होती.
राफेल करारात कोणत्याच त्रुटी नसून कुठलीही अनियमितता किंवा गैरप्रकार दिसून आलेला नाही असे कोर्टाने स्पष्ट केले होते.
याचबरोबर भारतीय हवाई दल सशक्त करण्यासाठी या प्रकारच्या हवाई विमानांची गरज आहे.असे ही कोर्टाने म्हटलं होतं.
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय दिला होता.
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 डिसेंबर 2018 रोजी या याचिकांवर निर्णय दिला होता.