Sun. Mar 7th, 2021

हा तर ‘भ्रम’संकल्प! – सुप्रिया सुळेंची बजेटवर संतप्त प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 2018 च्या अर्थसंकल्पाबाबत ट्वीटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

मध्यमवर्गीयांवर कराचा बोजा वाढवणार आणि 250 कोटीची उलाढाल करणारे ‘छोटे आणि मध्यम’ उद्योजक???? त्यांना करसवलत??? हा तर ‘भ्रमसंकल्प’. अशी टिका खासदार सुप्रिया सुळेंनी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केलीय.

बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही… पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही… शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही… बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही…

मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं.

एका बाजूला 40000 द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य असे म्हणत ट्वीटर पोस्ट द्वारे सुप्रिया सुळेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *