Tue. Nov 24th, 2020

मन की बात नव्हे बात पे बात- सुप्रिया सुळेंचा घणाघात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मोदी सरकारच्या काळात इतिहासातील सर्वाधिक शेतका-याच्या आत्महत्या झाल्या असल्याची घणघाती टीका सुप्रिया सुळेंनी केली. महाराष्ट्रासह देशभरात दुर्देवी परिस्थिति निर्माण झाली. यावर उपाययोजना करण्या ऐवजी मोदी सरकार हे पोकळ घोषणाबाजी करत मन की बात चा देखावा करत आहे.

 

आम्ही सर्वानी मिळून संघर्षयात्रेच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचे प्रयत्न केले परंतू सरकार कानावर हात ठेवत बहिरे पणाचे सोंग घेत असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

 

एकंदरित चित्र पाहता विद्यमान सरकार अपयशी ठरले असुन “मन की बात नुसते बात पे बात” करत काम शुन्य आहे मोदी सरकार हे जुमला सरकार बनले आहे असे ही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *