Sat. Mar 6th, 2021

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात वेगळं वळण

फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला एनसीबीकडून अटक…

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रोज वेगवेगळे वळण येतांना दिसत आहे. अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं ओशिवरा या भागातील मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली आहे. फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला एनसीबी कजून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे.

महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार असून त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही करण्यात आली आहे. एनसीबीच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करत असतं. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत असे, असं सांगितलं जात आहे. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत नैराश्यात असताना त्याला ड्रग्जही दिले जात होते, असा खुलासा झाला होता. या प्रकरणात नव्या ड्रग्ज अँगल आल्यानं तपासाला नवी दिशा मिळाली होती. दरम्यान, सुशांतसिंहची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. यानंतर रियाला आणि तिच्या भावाला बेल मिळाली. या प्रकरणी एनसीबीच्या चौकशीत अनेक बॉलिवूडच्या कलाकारांचे नाव समोर आले होते .अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी एनसीबी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *