Wed. Apr 14th, 2021

स्वप्निल जोशी, तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांनी जागतिक महिला दिनी सुरु केला आगळा उपक्रम ‘आत्मसन्मान’

मुंबई :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या ‘आत्मसन्मान’ हे बहुविक्रेता आणि बहुव्यापार इ-कॉमर्स व्यासपीठाचा शुभारंभ ८ मार्च २०२१ रोजी होत आहे. महीलांना त्यांच्या संकल्पना, कठोर मेहनत आणि जिद्द केवळ याच भांडवलावर व्यापार उदीम करण्याची आणि त्याद्वारे उद्योजक होण्याची अनोखी संधी देणारा हा उपक्रम आहे. प्रख्यात अभिनेता स्वप्निल जोशी, तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांच्या एकत्रित व्यवस्थापनाखाली हा उपक्रम दाखल होत असून त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथील महिलांना अनोखी अशी संधी प्राप्त होणार आहे.

स्वप्निल जोशी आणि तृप्ती पाटील हे दोघे ‘शॉप विथ ती’ चालवत महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट राबवीत असताना आता मंजुषा पैठणकर त्यांच्याशी जोडल्या गेल्या असून त्या माध्यमातून ‘आत्मसन्मान’ उपक्रम सुरु होत आहे. महिलांना व्यापार करण्यास, उद्योजक बनण्यास आणि त्या आधीच व्यापार-उदीम करत असतील तर त्याला नवी भारी देण्यासाठी हा उप्रक्रम सुरु झाला आहे. या प्रकल्पामध्ये सामील होण्यासाठी त्या महिलेकडे स्वतःचे उत्पादन असण्याची, उत्पादन करण्यासाठी भागभांडवल असण्याची, उद्योग कसा सुरु करावा याची संकल्पान असण्याची गरज नाही. त्याची सर्व काळजी ‘आत्मसन्मान’ घेणार आहे. या महिलांकडे हवी मेहनतीची तयारी आणि त्याला हवी कल्पकतेची जोड व वेळ देण्याची तयारी.

हा उपक्रम ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेवर आधारित आहे. ज्या महिलांना स्वतःची उत्पादने विकायची आहेत, किंवा ज्यांचायाकडे तशी उत्पादने नाहीत, पण व्यापार मात्र करायचा आहे, त्यांच्यासाठी हे एक आदर्श ऑनलाईन पणन व्यासपीठ आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे भागभांडवल नाही,त्यांना ते मिळवून देण्याची जबाबदारीसुद्धा ‘आत्मसन्मान’ घेते. महिलांचे उत्पादन असेल तर त्यांची दर्जा तपासणी करणे, त्यांची छायाचित्रे काढून ती वेबवेबसाईटवर टाकणे, आवश्यक ते इंटरनेट तसेच भाषाज्ञान महिलांना देणे, हे सर्व काम ‘आत्मसन्मान’तर्फे केले जाते.

या उपक्रमाबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणतात, “उभरते उद्योजक आणि त्यांच्या उध्यमशील कौशल्याचा उपयोग समाजाला मोठ्या प्रमाणवर होतो. जेव्हा हे उद्योजक महिला असतात तेव्हा त्यांचा समाजाला होणारा फायदा हा अधिक मोठा असतो. तृप्ती आणि मी ‘शॉप विथ ती’ची एकत्रित स्थापना केली कारण आम्हा दोघांचे ध्येय आणि मुल्ये एक होती. माझे जे सर्व महिला चाहते आहेत केवळ त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो आहे. ‘शॉप विथ ती’ हा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.”

“शॉप विथ ती’ला अगदी कमी कालावधीतच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि तो माझ्यासाठी एक पुरस्कारच होता. आता श्रीमती मंजुषा पैठणकर आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. आम्ही त्यांना ताई म्हणतो. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन यांच्या माध्यमातून आम्ही ‘शॉप विथ ती’ला एका नव्या ऊंचीवर घेवून जाऊ. त्यांच्यासारख्या या क्षेत्रात याआधीच स्थिरस्थावर झालेल्या आणि आमच्यासारखेच स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तिमत्वाशी जोडले जाताना मला मनस्वी आनंद होत आहे,” ते म्हणाले.

पैशांच्या बाबतीत या उपक्रमामध्ये पूर्ण पारदर्शकता बाळगली जाते. उद्योजक महिलांनी त्यांची केवायसी कागदपत्रे, उद्योग आधार, जीएसटी क्रमांक, एफएसएसएआय परवाना आणि उत्पादनाशी संबंधित इतर गोष्टी या उपक्रम व्यवस्थापनाला पुरविणे गरजेचे आहे. पैशांच्या व्यवहारांसाठी ‘आत्मसन्मान’ला उद्योजिकेच्या बँकेचे तपशीलसुद्धा अपेक्षित आहेत. सध्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

मंजुषा पैठणकर या ‘इम्परेटीव्ह बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या ‘आत्मसन्मान’बद्दल बोलताना म्हणाल्या, “समाजातील आणि सर्वच स्तरांमधील महिला आपले कुटुंब आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या शतकानुशतके विनासायास आणि समर्थपणे सांभाळत आल्या आहेत.त्या आघाडीवर त्यांचे कर्तृत्व वादातीतच आहे आणि त्यात त्यांच्यातील उद्यमशिलतेचे एक अंग लपलेले असते. त्यांच्या या उद्यमशिलतेला एक हक्काचे व सन्मानाचे व्यासपीठ असावे असा विचार मनात आला आणि ‘आत्मसन्मान’ या ई-कॉमर्स पोर्टलची निर्मिती झाली. त्याद्वारे सामील होणाऱ्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे.”

या प्रवासात ‘शॉप विथ ती’चे सहसंस्थापक स्वप्निल जोशी आणि तृप्ती पाटील यांच्याशी भेट झाली आणि लक्षात आले की ‘आत्मसन्मान’ आणि ‘शॉप विथ ती’ या दोन्ही संस्था एकाच संकल्पनेखाली आणि ध्येयाने काम करत आहेत. आम्ही तिघांनी एकत्रित काम करण्याचे ठरविले. मला पूर्ण विश्वास आहे की, दोन्ही संस्था एकत्रितपणे महिला सक्षमिकरणाचे ध्येय नक्कीच साध्य करतील,” त्या म्हणाल्या.

तृप्ती पाटील म्हणाल्या, “स्वप्निल आणि मला असा व्यवसाय सुरु करायचा होता की जो व्यापार-उदिमामधील होतकरू आणि स्थिरस्थावर अशा दोन्ही प्रकारच्या महिलांसाठी एक चांगले विपणन व्यासपीठ म्हणून काम करेल. किमान महाराष्ट्रामध्ये तरी असा काही उपक्रम राबविता येवू शकेल का, हे डोक्यात होते. आणि जणू भाग्यात लिहिले आहे अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे चहा पिता पिता गप्पा मारत असताना आमच्या असे धान्यात आले दोघांच्या संकल्पना एकसारख्याच आहेत. त्यातून मग ‘शॉप विथ ती’चा जन्म झाला. हा प्रकल्प आम्हा दोघांनाही खूप प्यारा आहे. आम्हाला आनंद आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *