Thu. Mar 4th, 2021

नागपूर विभागात स्वाईन फ्लू ची दहशत

नागपूर विभागात स्वाईन फ्लू (Swine Flue) ची दहशत चांगलीच वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लू मुळे उपचारांदरम्यान 42 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 368 रुग्णांची नोंद झालीय. यामुळे पूर्व विदर्भात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

या महिन्यात 5 हून जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

थंड वातावरणात स्वाईन फ्लूचे संक्रमण झपाट्याने होतं.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये हा आजार पसरण्याची जोखीम जास्त असते.

त्यामुळे रुग्ण आढळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

आढळलेल्या रुग्णांत विदर्भाच्या विविध भागातील काही रुग्णांचा समावेश या संदर्भात आरोग्य विभागसुद्धा खडबडून जागा झालाय.

वेगवेगळ्या रुग्णालयात औषध साठा आणि सुविधा तयार असल्याचं आरोग्य विभाग सांगतंय.

नागपूरसह विदर्भात याआधीही स्वाईन फ्लूची दहशत निर्माण झाली होती. त्यात अनेकांचे जीवसुद्धा गेले होते. त्यामुळे नागपूरसह पूर्व विदर्भात स्वाईन फ्लू चे रुग्ण वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात असला तरी ते पूर्ण होण्यास नागरिकांचं सहकार्य सुद्धा आवश्यक आहे. मात्र त्यासाठी आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *