Fri. Apr 23rd, 2021

‘सैरा नरसिंह रेड्डी’ सिनेमाचा पहिला लूक

तेलुगू सिनेमांची आता भारतभरात लाट आहे. ‘बाहुबली’ सिनेमानंतर तेलुगूमधील पिरीयड फिल्म्सचं देशभरात फॅन फॉलोइंग वाढलंय. त्यामुळे दक्षिणेचा मेगास्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिरंजीवी यांच्या आगामी सैरा नरसिम्हा रेड्डी या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अखेर या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार काम करत आहेत. बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चनदेखील या तेलुगू सिनेमात दिसणार आहेत. कन्नड सिनेमांतील सुपरस्टार सुदीप, तामिळ सिनेमातील दमदार अभिनेता विजय सेतुपती, भोजपुरी सिनेमांतील स्टार रवीकिशन यांसारख्या नायकांसोबत दक्षिणेतील आघाडीच्या तारका नयनतारा आणि तमन्नाही या सिनेमात आहेत. मात्र तरीही या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे मेगास्टार चिरंजीवी. आपल्या उमेदीच्या काळात तेलुगू सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय असणारे चिरंजीवी म्हणजे टॉलिवूडमधील जीवंत दंतकथा आहे. 80-90 च्या दशकात अमिताब बच्चनपेक्षाही जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून चिरंजीवी यांचं नाव होतं.

राजकारणात उतरल्यानंतर चिरंजीवी यांनी अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र कैदी नंबर 150 या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं होतं. हा त्यांच्या कारकिर्दीतील 150वा सिनेमा होता. आता सैरा नरसिंह रेड्डी हा सिनेमा त्यांचा 151वा सिनेमा आहे.

हा सिनेमा आंध्र प्रदेशातील क्रांतीवीर सैरा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमाही भव्यदिव्य स्वरूपाचा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *