Sun. Feb 28th, 2021

संतापजनक! डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकल्याचा आरोप!

कोरोनाचं संकट देशावर असताना अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन मानवसेवा करणाऱ्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून थाळीनाद करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. त्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. मात्र या उलट दिल्लीच्या तबलिगी जमात मरकज या धार्मिक कर्यक्रमात सहभागी झालेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्यात आलेले लोक मात्र डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ल्लीच्या निजामुद्दिनमध्ये आयोजित केलेल्या तबलिगी जमात मरकज या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी अनेकजण कोरोनाग्रस्त असल्याचं निष्पन्न झालं. या कार्यक्रमासाठी विविध राज्यातले लोक जमा झाले होते. कार्यक्रमानंतर ते आपआपल्या राज्यांत परतले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत तबलिगी जमात मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १६७ सदस्यांना नॉर्थर्न रेल्वेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र यांतील अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या डॉक्टरांशी गैरवर्तन करत आहेत. नॉर्थन रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी अशी माहिती दिली आहे.

क्वारंटाईनमधील लोक कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. जाणीवपूर्वक सगळीकडे थुंकत आहेत. संतापजनक बाब म्हणजे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही हे लोक थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वृत्तामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *