Tue. May 11th, 2021

mumbai – goa

परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, वाहतुकीवर परिणाम

परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य

गेल्या चार दिवसात मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. पोलादपूर ते इंदापुर वर खड्डयांचे प्रमाण कमी आहे तर इंदापुरचा संपुर्ण रस्ता खड्डयांनी भरला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे  पडल्याने रस्ता  खचून संपुर्ण रस्ता धोकादायक बनला आहे.

मुंबई-पुणे लोहमार्गावर पुन्हा एकदा रेल्वे घसरली, वाहतूकीवर परिणाम

मुंबई-पुणे लोहमार्गावर पुन्हा एकदा रेल्वे घसरली. सुदैवाने यावेळी ही मालगाडी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दोन डबे पलटी झालेत, काही डबे डाऊन आणि मिडल लाईनवर आडवे होते तर काही डबे मागे सोडून मालगाडी पुढे गेली होती. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळच ही आणि ते ही डाऊन लाईनवरच ही पहाटे 4:30 च्या सुमारास घडलेली आहे.