राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंडदा भाजपात जाणार
निवडणूक जवळ आली असली तरी राष्ट्रवादीची गळती कमी होण्याचे काही चित्र दिसत नाही आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणूकीच्या वेळी कार्यकर्त्याने नव्हे तर चक्क उमेदवारानेच राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.