आषाढी एकादशीसाठी पंढरी सज्ज, दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे. आषाढीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले करण्यात आले आहे.