पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला, पर्यटनव्यवसाय ठप्प
कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाणारा मार्ग खचला असून हा मार्ग पुर्वपदावर यायला अद्यापही पाच ते दहा दिवस लागणार आहेत. पन्हाळ्याकडे येणारा मुख्य मार्ग खचल्याने तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे.