सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा शिवसेनेत; आदित्य ठाकरेंसोबत रोड शोमध्ये सामील
आगामी विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर ठेपली असून अभिनेता सलमान खान यांचा बॉडीगार्ड गुरमीत शेराने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत प्रवेश केला.