Fri. Apr 16th, 2021

solar project

धारूरमध्ये सौरऊर्जा प्रकल्पात भीषण स्फोट, एक कामगार ठार तर दोन जखमी

धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड झाल्याने दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.