Mon. Dec 6th, 2021

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर महिला वृत्त निवेदिकांवर बंदी

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घालण्यात आली आहे. आरटीए पश्तो या वृत्तवाहिनीच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. शबनम डावरान असं या वृत्त निवेदिकेचं नाव असून तिला तालिबान्यांनी कामावरुन काढून टाकलं आहे. देशात केवळ शरीयत कायद्याअंतर्गत महिलांना काम करण्याची परवानगी असल्याचं तालिबान्यांनी म्हटलं आहे.

शबनम डावरान कामावर पोहोचली असता कामावर येण्याची गरज नाही असं तिला सांगण्यात आलं. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यापासून तेथील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषद घेत, ‘आता अफगाणिस्तान मुक्त करण्यात आलं आहे. तालिबान्यांच्या शासनकाळात महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. महिलांना इस्लामी कायद्याच्या मानदंडांचं पालन करुन अधिकार दिले जातील. महिलांना आरोग्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल’, असं म्हटलं होतं. मात्र तरीदेखील शबनम डावरान हिला तालिबान्यांनी कामावरुन काढून टाकलं आहे.

(Photo Credit: Google)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *