मोदींविरोधात ट्विट करणाऱ्या अभिनेत्रीवर भाजपने दाखल केली एफआयआर

अभिनेत्री ओवीया हेलन हिच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याबद्दल भाजपाने तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक विकास प्रकल्प सुरू केले. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी दक्षिण भारतीय अभिनेत्री ओवीयाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर #GoBackModi असं ट्वीट केले. ओवियाचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचीही अफवा आहे.

ओव्या हिने पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप आहे. शिवाय हे ट्विट केल्यानंतर ओवीया अनेक भाजप नेत्यांनी खरीखोटी सुनवली आहे. भाजपाच्या तमिळनाडू युनिटने अभिनेत्री ओवीया हेलन हिच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. सध्या ओवीयाविरोधात कारवाई करण्याचे आवाहन तामिळनाडूचे भाजपचे प्रदेश सचिव डी एलेक्सिस सुधाकर यांनी चेन्नई येथील पोलोस अधीक्षक सीबी-सीआयडीकडे गेले आहे.