Thu. Nov 26th, 2020

आता ‘तान्हाजी’ सिनेमा जास्तीत जास्त लोक पाहणार, कारण…

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. हा सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहावा आणि त्यातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी, शिवाजी महाराजांचा इतिहास आणखी मोठ्या प्रमाणात लोकांना समजावा यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांत हा सिनेमा करमुक्त केला आहे. (Tanhaji- the unsung warrior movie) आता हा सिनेमा महाराष्ट्रातही करमुक्त होणार आहे (Tax-free)

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ (Tanhaji- the unsung warrior) हा सिनेमा ज्या योद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे, तो योद्धा महाराष्ट्राच्या मातीतला, शिवछत्रपतींचा एकनिष्ठ मावळा होता. त्यामुळे सुभेदार तान्हाजी यांच्यावर आधारित सिनेमा त्यांच्याच महाराष्ट्रात करमुक्त केला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली होती. हा सिनेमा कर-मुक्त (Tax-free) करावा अशी सातत्याने मागणी होत होती. अखेर महाराष्ट्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सिनेमा tax free  करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच घोषणा करतील, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरून दिली आहे.

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा करमुक्त केल्यामुळे याच्या तिकिटाच्या किमतीत 30 ते 40 रुपयांचा फरक पडणार आहे. तिकिटं स्वस्त झाल्यावर तो जास्तीत जास्त सामान्य लोकांना पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *