Mon. Dec 6th, 2021

तारापुरात 50 फूट उंचावरुन पडून कामगाराचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातमध्ये एका कारखान्यात कामगाराचा मृत्यू झाला. 50 फूट उंचावरुन पडून कामगाराचा बळी गेला. रोहित शर्मा असं या कामगाराचं नाव होतं.

 

 

रोहित प्लॉट नंबर 212 मध्ये काम करत असे. रविवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला असता त्याच्यावर काळाने घाला घातला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, तिथेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *