Tue. Nov 24th, 2020

टाटा फायनान्सचे माजी एमडी दिलीप पेंडसेंची कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबल उडाली. पेंडसे यांनी दादरमधील कार्यालयामध्येच आत्महत्या केली.

 

आत्महत्येपुर्वी त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वैयक्तिक कारणातून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दादर पुर्वेकडील स्वामीनारायण मंदिराजवळील रॉयल ग्रेस या इमारतीमध्ये दिलीप पेंडसे पत्नीसोबत राहत होते. याच इमारतीच्या तळमजल्यावर पेंडसे यांचे कार्यालय होते.

 

पेंडसे हे टाटा फायनान्स लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. 2001 मध्ये टाटा फायनान्सच्या हक्कभाग विक्री प्रक्रियेत अनियमिता केल्याचा ठपका पेंडसेवर ठेवण्यात आला होता.

 

सेबीने डिसेंबर 2012 मध्ये पेंडसे यांच्यावर दोन वर्षांपर्यंत भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली होती. पेंडसे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समुहाने 2001 मध्ये त्यांच्यावर कारवाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *