Thu. Dec 2nd, 2021

शबरीमालात महिलांच्या प्रवेशाचे समर्थन

केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात भूमिका घेणाऱ्या त्रावणकोर देवस्थान मंडळाने अखेर माघार घेतली आहे.

सर्व वयोगटांतील महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे केरळ सरकारबरोबरच मंडळानेही समर्थन केले आहे.

त्यांनी निकालाच्या फेरविचार याचिकांविरोधात भूमिका मांडली असून, न्यायालयाने बुधवारी याबाबतचा निकाल राखून ठेवला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने केरळ सरकार, त्रावणकोर देवस्थान मंडळ (TDB), नायर सव्‍‌र्हिस सोसायटी व इतरांसह सर्व पक्षकारांच्या वतीने युक्तिवाद ऐकला आणि या निकालाचा फेरविचार करावा अथवा नाही याबाबत निर्णय नंतर देऊ, असे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात फेरविचार याचिकेसह 64 याचिका न्यायालयाच्या विचाराधीन आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर 2018 रोजी शबरीमला मंदिरातील महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याचा ऐतिहासिक निकाल दिला.

त्याविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशासाठी बंदी करणे हे हिंदू धर्मासाठी आवश्यक नसल्याचे सांगून, केरळ सरकारने फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांना जोरदार विरोध केला.

त्रावणकोर देवस्थान मंडळाने याआधी महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’च्या याचिकेला विरोध केला होता. आता मात्र मंडळाने माघार घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *