Sat. Jul 4th, 2020

धक्कादायक ! गुरूनेच केला विद्यार्थ्यावर बलात्कार

पुण्यातील निगडी येथे एका नामवंत शाळेत 14 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकानेच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली असल्याची माहिती पीडिताने दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यामध्ये निगडीतील एका नामांकित शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा उघडकीस आले आहे.

निगडीतील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने पाच महिन्यांपूर्वी 14 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

अनूराग हिंगे असे आरोपीचे नाव आहे.

हिंगेने मुलाला वर्गात बोलावून मिठी मारत त्याच्या बरोबर अनैसर्गिक चाळे करत लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर याबाबत कोणाला न सांगण्याची मुलाला धमकी दिली.

केवळ इतकेच नसून याबद्दल कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.

धमकीला घाबरल्याने पीडित मुलगा जानेवारीपासून मौन बाळगून होता.

अखेर घाबरत त्याने हा प्रकार आईबाबांच्या कानावर घातला.

पीडिताच्या पालकांनी लगेचच पोलिस स्थानकात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी हिंगेवर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *