शिक्षक कोरोनाच्या विळख्यात
कोरोना टेस्टच्या पार्शवभूमीवर शिक्षक कोरोनाच्या विळख्यात आहेत

सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना टेस्ट सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना टेस्ट करण्यासाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळतं आहे. नाशिक, सांगलीसह हिंगोलीतही शिक्षकांची रॅपिड टेस्ट सध्या सुरू आहे.
कोरोना टेस्टच्या पार्श्वभूमीवर शिक्षक कोरोनाच्या विळख्यात आहेत. नाशकात 24 तर कोल्हापुरात 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. शाळा सूरू करण्यापूर्वी तपासणीत शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येते आहे. आणि याचमुळे आता महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याचा घोळ कायम असल्याचं पहायला मिळत आहे.