Sat. Nov 28th, 2020

सहावीतील विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून अत्याचार, मंत्री अशोक चव्हाण पीडितेच्या भेटीला

नांदेड जिल्ह्यातील साईबाबा शाळेमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर दोन नराधम शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. ही घटना महिनाभरापूर्वी घडली होती. पीडितेची प्रकृती बिघडल्यावर या घटनेचा खुलासा झाला आहे. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पीडित मुलीची रुग्णालयात भेट घेतली.

अशोक चव्हाण पीडितेच्या भेटीला

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी रुग्णालय प्रशासनाला योग्य सुविधा आणि उपचार पुरवण्यासंदर्भात सूचना दिल्या.

पीडितेला सरकारच्या वतीने सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असही त्यांनी स्पष्ट केलंय.

काय घडलं होतं नेमकं?

नांदेडमधल्या शंकरनगर येथील साईबाबा शाळेत पीडित विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे.

एका महिन्यांपूर्वी शाळेतील रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे या दोन शिक्षकांनी तिला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो असं सांगून शाळेतील एका खोलीत नेलं.

प्रत्यक्षात मात्र मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर लौंगिक अत्याचार केले.

या धक्कादायक घटनेची माहिती पीडितेच्या आईला मिळाल्यावर तिने शाळा प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र संतापजनक बाब म्हणजे या विधवा मातेवरच शाळेने दबाव आणून तिच्या तक्रारीची दखल न घेता तिला हाकलून लावण्यात आलं.

मात्र काही दिवसांपूर्वी पीडित विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच सर्वत्र संतापाचा उद्रेक झाला.

सामाजिक संस्थांच्या सहाय्याने रामतीर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.

शाळेचे मुख्याध्यापक, आरोपी शिक्षक आणि एका महिलेविरोधात आता गुन्हा दाखल झालाय. मात्र शाळेचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे पोलीस तपासात टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *