Mon. Jan 24th, 2022

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा !

इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे १८ जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या १५ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. १८ जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.

कोणाला मिळणार अंतिम सामन्यात संधी ?

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश असणार आहे.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून भारतीय संघ सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *