Fri. Feb 21st, 2020

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई : टीम इंडियाची वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया विंडीज विरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 3 टी-20 आणि 3 वनडे मॅच खेळणार आहे. टी-20 सीरिजला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 3 मॅचच्या वनडे सीरिजला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

विराट कोहलीने टीममध्ये कमबॅक केलं आहे. विराटला बांगलादेश विरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

टी-20 सामने

पहिली टी-20 – 6 डिसेंबर 2019, वानखेडे स्टेडिअम, मुंबई

दुसरी टी-20 – 8 डिसेंबर 2019, तिरुअनंतपुरम

तिसरी टी-20 – 11 डिसेंबर 2019, हैदराबाद

एकदिवसीय सामने

पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई

दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम

तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *