Sat. May 30th, 2020

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई : आगामी 2020 च्या under -19 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. यंदाची ही 13 वी वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

दक्षिण आफ्रिकेला 21 वर्षांनंतर अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमान पद मिळालं आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत 1998 साली अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

या वर्ल्ड कप स्पर्धेला 17 जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे. तर ७ फेब्रुवारीपर्यंत खेळण्यात येणार आहे.

अंडर- 19 वर्ल्ड कप स्पर्धेला 1988 सालापासून सुरुवात झाली. या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडिया सर्वात यशस्वी ठरली आहे. टीम इंडियाने याआधी 4 वेळा अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 साली वर्ल्ड कपवर आपले नाव कोरलं होते. त्यामुळे टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपमधून टीम इंडियाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. यात मोहम्मद कैफ, युवराज सिंह, विराट कोहली, रविंद्र जडेजा, पृथ्वी शॉ यासारख्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

सप्टेंबर महिन्यात 19 वर्षाखालील टीम इंडियाने आशिया चषक जिंकला होता. यात टीम इंडियाने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला होता.

या विजयात मुंबईकर अथर्व अंकोलेकरचं मोठं योगदान होतं. त्याने अवघ्या 28 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेतल्या होत्या. तसेच या आशिया चषकातील 4 सामन्यात त्याने 12 विकेट घेतले.

त्यामुळे मुंबईकर अथर्वकडून आगामी 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

 

या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार आहेत. या 16 टीम एकूण 4 गृपमध्ये विभागल्या आहेत. टीम इंडियाला ए गृपमध्ये ठेवण्यात आलं आहेत. प्रत्येक गृपमधील टॉप -2 टीम पुढील टप्प्यात प्रवेश करतील.

Group A: India, New Zealand, Sri Lanka, Japan

Group B: Australia, England, West Indies, Nigeria

Group C: Pakistan, Bangladesh, Zimbabwe, Scotland

Group D: Afghanistan, South Africa, UAE, Canadaअशी आहे टीम इंडिया

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार&विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शशावत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटीलLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *