Fri. Dec 3rd, 2021

U19CWC, Semi Final : टीम इंडियाची ‘यशस्वी’ कामगिरी, फायनलमध्ये धडक

टीम इंडियाने पाकिस्तानवर 10 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 173 धावांचे माफक आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले. टीम इंडियाने 35.2 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या.

टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या सलामीच्या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

यशस्वी जयस्वालने सिक्स ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तसेच या सिक्ससोबत त्याने आपले शतक पूर्ण केले.

यशस्वी जयस्वालने नाबाद 105 धावा केल्या. तर दिव्यांश सक्सेना यानेही नाबाद 59 धावा केल्या.

6 फेब्रुवारीला दुसरी सेमी फायनल खेळण्यात येणार आहे. ही सेमीफायनल मॅच बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणार आहे.

या सामन्यातील विजयी टीमसोबत टीम इंडिया फायनलमध्ये भिडणार आहे.

याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानला टीम इंडियाच्या बॉलर्सने सुरुवातीला धक्का द्यायला सुरुवात केली. टीम इंडियाच्या बॉलर्सने पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले.

पाकिस्तानच्या 6 खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. पाकिस्तानकडून सर्वाधिक 62 धावा या कॅप्टन रोहाली नझीर यांनी केल्या. तर हैदर अलीने 56 धावा केल्या.

टीम इंडियाकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *