Thu. Jul 9th, 2020

टीम इंडियाचा मालिका विजयासह ‘हा’ नवा विक्रम

कोलकाता : टीम इंडियाने बांगलादेशवर एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. याविजयासह टीम इंडियाने 2-0 च्या फरकाने मालिका आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने याविजयासोबतच विक्रम केला आहे.

काय आहे रेकॉर्ड ?

टेस्ट क्रिकेटमध्ये सलगपणे 4 वेळा एका डावाने सामना जिंकण्याची कामगिरी टीम इंडियाने केली आहे. ही कामगिरी टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वात केली आहे. हा कारनामा इंडियाने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध केला आहे.

टीम इंडियाने ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली कसोटी मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली होती. यातील दुसरी आणि तिसरी कसोटी मॅच टीम इंडियाने डावानी जिंकली होती.

आफ्रिके विरुद्ध झालेली दुसरी टेस्ट टीम इंडियाने डाव आणि 137 धावांनी जिंकली होती. तर तिसरी टेस्ट मॅच इंडियाने डावासह 202 धावांनी जिंकली.

तसेच बांगलादेश विरुद्धातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने बांगलादेशला डाव आणि 146 रन्सने पराभूत केले. तर दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर डावासह 46 धावांनी विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *