Fri. Sep 25th, 2020

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज 14 जानेवारीपासून

टीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने सीरिज जिंकली. यासह टीम इंडियाने 2020 या वर्षाची विजयी सुरुवात केली.

यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

या मालिकेला 14 जानेवारीपासून मुंबईत सुरुवात होत आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने या 3 वनडेसाठी टीमची घोषणा केली आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून टॉप 11 मध्ये मार्नस लैबुशनला संधी मिळू शकते. लैबुशन गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी पुनरागमन करत आहे.

या दोघांना लंकेविरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती.

टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी.

टीम ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, डेव्हिड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, मार्नस लैबुशेन, पीटर हॅंड्सकॉम्ब, सीन एबॉट, केन रिचर्डसन, एश्टन एगर, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर आणि एडम जॅम्पा.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचचे वेळापत्रक

14 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, पहिली वनडे, मुंबई

17 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, दूसरी वनडे, राजकोट

19 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, तिसरी वनडे, बंगळुरु

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यात टीम इंडिया 5 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *