Sun. Apr 18th, 2021

INDvsWI, Final : मालिकेतील निर्णायक आणि अंतिम सामना 22 डिसेंबरला

टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी 22 डिसेंबरला होणार आहे. हा सामना कटक येथे होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे.

3 सामन्याच्या मालिकेत विंडिज आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1-1 असा सामना जिंकला आहे. त्यामुळे 22 डिसेंबरला होणारा अंतिम सामना फार अटीतटीचा असणार आहे.

विंडिजने मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला. तर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात विंडिजचा पराभव केला.

यामुळे टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यामुळे रविवारी होणारा सामना निर्णायक असेल.

टीम इंडियाने गेल्या 15 वर्षात भारतात एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मालिकेतील अंतिम सामना जिंकून हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.

तर हा अंतिम सामना जिंकून टीम इंडियाचा मायदेशात मालिका पराभव करण्याचा प्रयत्न विंडिजचा असेल.

रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली.

त्यामुळे अंतिम सामन्यात देखील यांच्याकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना असेल.

तर बॉलिंगची मदार मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.

दीपक चहारला झालेल्या दुखापतीमुळे नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यासाठी नेटमध्ये सराव कसून सराव केला आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी

वेस्ट इंडिज : शाय होप, सुनील अ‍ॅम्ब्रिस, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श, अल्झारी जोसेफ आणि शेल्डन कॉट्रिएल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *