Tue. Feb 25th, 2020

#NZvsIND, 2nd T20 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 7 विकेटने दणदणीत विजय

टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा 7 विकेटने पराभव केला आहे. न्यूझीलंडचा केलेल्या पराभवामुळे टीम इंडियाने 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने विजयासाठी टीम इंडियाला 133 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान अवघ्या 3 विकेटच्या  मोबदल्यात पार केले. टीम इंडियाकडून केएल राहुलने नाबाद 57 धावांची खेळी केली. तर राहुलला श्रेयस अय्यरने चागंली साथ दिली. अय्यरने 44 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. हिटमॅन रोहित शर्मा 8 धावा करुन बाद झाला. यानंतर 39 धावसंख्या असताना कॅप्टन विराट आऊट झाला. विराटने 11 धावा केल्या.

यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 रन्सची पार्टनरशीप केली.

न्यूझीलंडकडून टीम साऊथीने 2 तर इश सोढीने 1 विकेट घेतला.

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या बॅट्समनना अवघ्या 132 धावांवरच रोखले. न्यूझीलंडकडून ओपनर मार्टिन गुप्टील आणि टीम सेईफरेट या दोघांनी प्रत्येकी 33 धावा केल्या.

टीम इंडियाकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर शार्दूल ठाकूर, जस्प्रीच बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

दरम्यान तिसरी टी-20 मॅच 29 जानेवारीला हॅमिल्टन येथे खेळण्यात येणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *