Fri. Sep 25th, 2020

INDvsSL,2nd T20, टीम इंडियाचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामना खेळण्यात येणार आहे.

हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये पार पडणार आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुवाहाटीमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पहिला सामना होऊ शकला नाही.

दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये शिखर धवन आणि जस्प्रीत बुमराहने कमबॅक केले आहे. त्यामुळे या दोघांच्या खेळीकडे लक्ष असणार आहे.

याआधी 2017 साली श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया टी20 मॅच खेळली होती.

या सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 88 धावांनी पराभव केला होता.

या मॅचमध्येच रोहित शर्माने वेगवान शतक मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. रोहितने आपले शतक 35 बॉलमध्ये पूर्ण केले होते.

रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात 43 बॉलमध्ये 118 धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीत त्याने तब्बल 10 सिक्स आणि 12 फोर लगावले होते.

तर केएल राहुलने देखील रोहितला चांगली साथ दिली होती. राहुलने या सामन्यात 89 रन्स केल्या होत्या.

रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 165 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.

त्यामुळे आजच्या लंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये बुमराह, धवन, रोहित आणि राहुल यांच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

श्रीलंकेला गेल्या 12 वर्षांपासून इंडिया विरुद्ध टी-20 सीरिज जिंकता आलेली नाही.

टीम इंडिया आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 6 सीरिज खेळल्या गेल्या आहेत.

यापैकी 5 सीरिजमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 1 मालिका अनिर्णित ठेवण्यात लंकेला यश आले होते.

या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत एकूण 16 टी-20 मॅच खेळल्या गेल्या आहेत. यात टीम इंडियाने 11 तर श्रीलंकेने 5 सामने जिंकले आहेत.

टीम इंडिया : शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जस्प्रीत बुमराह आणि नवदीप सैनी

टीम श्रीलंका : अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा (विकेटकीपर), ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, इसरु उडाना, वनिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा आणि लसिथ मलिंगा (कॅप्टन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *