Thu. Jan 20th, 2022

IndvsSL, 1st t20, टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

श्रीलंका भारताच्या दौऱ्यावर आली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध श्रीलंका 3 टी 20 सामने खेळणार आहे. श्रीलंके विरुद्धची टीम इंडियाची ही नववर्षातील पहिलीट टी-20 मालिका असणार आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच गुवाहटीतील बारसपारा स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.

श्रीलंका विरुद्धच्या या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये गब्बर शिखर धवन आणि जस्प्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतून विश्रांती घेतली आहे.

त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष असणार आहे.

विशेष म्हणजे टीम इंडिया १० वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली वर्षातील पहिली मॅच ५ जानेवारीला श्रीलंकेसोबतच खेळली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सीरिजसाठी टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर श्रीलंकेच्या टीमची धुरा वेगवान बॉलर मलिंगाच्या खांद्यावर असणार आहे.

टीम इंडिया : टीम इंडिया : शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जस्प्रीत बुमराह आणि नवदीप सैनी

टीम श्रीलंका : अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा (विकेटकीपर), ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, इसरु उडाना, वनिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा आणि लसिथ मलिंगा (कॅप्टन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *