Tue. Oct 27th, 2020

कोकणात धावणार ‘तेजस’, कशी असेल एक्सप्रेस?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली आणि एखाद्या विमानाप्रमाणे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशी ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते करमाळी (उत्तर गोवा) दरम्यान धावणार आहे.

 

कोकण आणि गोव्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवास देणाऱ्या या एक्स्प्रेसचं भाडं राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या तुलनेत थोडंसं अधिक असणार आहे.

 

या गाडीत अनेक अतिरिक्त सुविधा देण्यात आल्यामुळे इतर गाड्यांपेक्षा या गाडीचं भाडं जास्त ठेवण्यात आलं आहे, असे प्रभू यांनी सांगितलं.

तेजस एक्सप्रेस कशी असेल?

तेजस एक्स्प्रेस ताशी वेग १३० कि.मी. वेगाने धावणार

तेजसला मेट्रोप्रमाणे दरवाजे

प्रत्येक सीटमागे एलसीडी

गाडीत वायफायची सुविधा

प्रवाशांसाठी तेजसमध्ये अटेंडंट

शौचालयात टचलेस नळ आणि बायो व्हॅक्यूम सिस्टीम

प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा

तेजसमध्ये पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, डेस्टिनेशन बोर्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *