दूरसंचार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दरवाढ

मुंबई : मोबाईल युझर्ससाठी वाईट बातमी आहे. टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन- आयडिया आणि एअरटेलने मंगळवार ३ डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले.
त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जियोनेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे मोबाईल युझर्सच्या खिशाला कात्री लागणार आहे.
तसेच मोबाईल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.
एअरटेल
* प्रतिदिन ५० पैसे ते २.८५ रुपये दरवाढ
* डेटा आणि कॉलिंगचे भरघोस फायदे देण्याचा दावा
* निश्चित कॉलमर्यादा ओलांडल्यास प्रतिमिनीट ६ पैसे
जिओ
* ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्क्य़ांपर्यंत दरवाढ
* नव्या प्लॅन्समधून ग्राहकांना ३०० टक्के अधिक लाभ देण्याचा दावा
’‘ऑल इन वन प्लॅन्स’ मध्ये अनलिमीटेड कॉलिंग आणि इंटरनेट वापराचा दावा
व्होडाफोन-आयडिया
* अन्य कंपन्यांच्या मोबाइलवर केलेल्या कॉलसाठी प्रतिमिनीट ६ पैसे
* दरवाढीमुळे १,६९९ रुपयांचा अनलिमीटेड वार्षिक प्लॅन २,३९९ रुपयांवर
* प्रतिदिन १.५ जीबी डेटा वापराचा अनलिमीटेड प्लॅन १९९ वरून २४९ रुपयांवर