‘तुला पाहते रे’ मधील बिपीन टिल्लूचा अभिनय प्रवास

‘तुला पाहते रे’ या सिरीयलने अल्पावधीतच लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे.या सिरीयलमधील सर्व कलाकार उत्तम अभिनय करत असून बिपीन टिल्लु म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडे यांनीही आपल्या भूमिकेतून रसिकांना चांगलेच वेड लावले. प्रथमेशने “तुला पाहते रे” या सिरीयलपूर्वी हिंदी सिरीयलमध्येही काम केलं. पण बिपीन टिल्लूची भूमिका त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरल्याचं तो म्हणतो.
कसा झाला प्रथमेशचा प्रवास सुरू?
बिपीन टिल्लु म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडे म्हणतो की, अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी घरच्यांनाही पाठिंबा दिला नाही.
पण अभिनयावरील त्याचे प्रेम आणि निष्ठा पाहून घरच्यांनी शेवटी परवानगी दिली.
मागील 3 वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात काम करत असून त्याआधी मी मार्केंटिंग क्षेत्रात जॉब करत होतो.
काही कालावधीनंतर मला कंटाळा आला, त्यानंतर मी माझं पॅशन असलेल्या अभिनयाकडे वळलो.
आई-बाबांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास आधी विरोध केला, त्यानंतर मात्र “तू दोन वर्षांत काही करून दाखवलंस तरच तू या क्षेत्रात काम करू शकतोस.” असं सांगितलं.
2016 साली मी अभिनयासोबत नोकरी केली.
2017 मध्ये पूर्ण वेळ क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर “वो अपनासा”, “ऐसी दिवानगी देखी नही”, “मेरे पापा हिरालाल” अशा अनेक मालिकांमधून डॉक्टर, सीए, अकाउंटंट, वकील अशा भूमिका केल्या.
गेल्यावर्षी मे मध्ये मी “तुला पाहते रे” या सिरीयलसाठी ऑडिशन दिले.
एक – दोन महिन्यानंतर माझी निवड झाली, मग लुक टेस्ट झाला आणि माझ्या प्रवासाला सुरूवात झाली.
या मालिकेत सुरूवातीच्या एका भागातील सीनमध्ये ईशा माझ्यासोबत बोलते,तेव्हा टिल्लूला खूप आनंद होतो आणि तो डान्स करतो, असं दाखवलंय.
या सीननंतर हा टिल्लू कोण आहे, हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली.
त्यामुळे मालिकेतील माझा प्रवास वाढवला गेला.
या भूमिकेमुळे मला झी मराठीच्या उत्सव नात्यांचा शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
भूमिकेसाठी बेस्ट कॉमेडी कलाकार नामांकन मिळालं.
बिपिन टिल्लू या भूमिकेने मला एवढं काही दिलं की मी देवाचे आणि आई-बाबांचे आभार मानतो.
तसंच अपर्णा केतकर, अतुल केतकर, झी मराठी,अभिजीत खांडेकर,शर्वरी पाटणकर,शेखर ढवळीकर,गिरीश मोहिते,चंद्रकांत गायकवाड, माझे सहकलाकार यांचेही प्रथमेशने आभार मानले.