Wed. Jan 19th, 2022

मराठवाडा, विदर्भासह मुंबईतही तापमान वाढणार

१९ मे पासून राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ होत आहेे. असा अंदाज तंज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील याठिकाणी कमाल तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.  तसेच  18 ते 21 मे दरम्यान मुंबईतही कमाल तापमानात वाढ होणार आहे.

तापमानात होणार इतक्या अंशानी वाढ

राज्यात काही भागात कमाल तापमानापेक्षा अधिक वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश तापमानात चांगलीच  वाढ होणार आहे.

२५ मे पर्यंत या भागातील तापमानात अधिक वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

अकोला, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्य़ांत  तापमानाचा पारा 46 अंशापर्यंत पोहचू शकतोे.

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील.

चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्ह्य़ांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्य़ांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल.

मुंबईतील तापमानातही होणार वाढ

18 ते 21  मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील 48 तासांत मुंबई शहर व उपनगरात कमाल पारा 35  अंशावर जाईल.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *