Fri. Apr 23rd, 2021

पाकिस्तानात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला!

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात असणाऱ्या ग्वादर येथे एका 5 star हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. ‘पर्ल कॉण्टिनेंटल’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये 3-4 दहशतवाद्यांनी घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सायंकाळी साधारण 4.50 च्या सुमारास या हॉटेलमध्ये 3-4 दहशतवादी घुसले आणि गोळीबार सुरू केला.

मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

ग्वादरचं आंतरराष्ट्रीय महत्त्व!

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच हॉटेलमधील बहुतांश लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं पोलीस महासंचालक मोहसीन हसन भट्ट यांनी सांगितलं.

गेल्या काही काळापासून ग्वादर भागाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय.

हे हॉटेल ग्वादरच्या ‘कोह-ए-बाटिल’ डोंगरावर आहे.

येथे पर्यटनासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

ग्वादर चीनसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं.

चीन पाकिस्तान सरकारसोबत ग्वादर येथे विमानतळही develop करत आहे.

पोलिसांनी हॉटेलच्या आसपासच्या संपूर्ण भागाला वेढा घातल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *