Thu. Jan 20th, 2022

मुंब्र्यात आरोपीचा पोलिसांवर चाकूहल्ला

ठाणे: ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपीने चाकूहल्ला केला. ‘बद्रुद्दिन’ असे ह्या आरोपीचे नाव आहे.

बद्रुद्दिनने महानगरपालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू दिली नाही, म्हणून त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस बदृद्दिन याला ताब्यात घ्यायला गेले असता बद्रुद्दिनने बाजूच्या एका मटणाच्या दुकानातून धारदार चाकू घेतला आणि मी स्वतःलाच संपवून टाकेल अशी धमकी पोलिसांना देऊ लागला.

या सर्व घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. या व्हिडिओमध्ये बद्रुद्दिन याला घेऊन जायला आलेल्या पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांना चाकूचा धाक दाखवून बद्रुद्दिन घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्यावर मुंब्रा पोलिसांच्या कामात अडथळा आणणे म्हणजेच सरकारी कामात अडथळा आणणे या अंतर्गत कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा पोलीस बद्रुद्दिन याचा शोध घेत असून बद्रुद्दिनवर याआधीदेखील गुन्हे दाखल आहेत का, त्याने काही अनधिकृत बांधकाम केले आहे का, याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *