ठाण्याचे नगरसेवक चालले महाबळेश्वर सहलीला
जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रती काय भूमिका हवी, अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची टूर प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला गेली. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांना विविध प्रकारचा अभ्यास शिकवला जाणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी ठाण्यातील नगरसेवकांना महाबळेश्वरचा मोह कशाला झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही केवळ महाबळेश्वरची पावसाळी सहल ठरेल, अशी टीका आता होऊ लागली.