Sun. Oct 17th, 2021

ठाण्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता एका नवीन आजाराची लक्षणे दिसून येत असून त्याला म्युकरमायकोसिस या नावाने ओळखले जात आहे. ही लक्षणे असलेला पहिला रुग्ण ठाण्यात आढळला आहे.

ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही चिंता वाढवणारी घटना घडली असून एक ५६ वर्षीय महिला या आजाराची बळी ठरली आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्या महिलेची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल समोर आला.

जिल्हा शल्यचिकित्सक डाॅक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी या महिलेची तपासणी केली असता महिलेच्या डोळे वर आलेले दिसून आले, तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले. तसेच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणे आढळून आली.

उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती तसेच इतरही अंतर्गत लक्षणे असल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आले. त्यामुळे या महिलेला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *