Sun. Oct 17th, 2021

ठाणे महापालिकेचा बेजबाबदारपणा उघड

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर दिसून येत आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनावरदेखील ताण येत आहे.मात्र ठाण्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.

ठाणे महानगर पालिकेची आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय ठाण्यातील वसंत विहार येथील एका जेष्ठ दांपत्याला आला.या दांपत्याने १३ एप्रिलपासून रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनंती केली होती. मात्र विनंती करुनही वॉर रुममधून कोणताही प्रतिसाद न मिळाला नाही. अखेर या दांपत्याने आपल्या घरातच स्वत:हून स्वतःला ऑक्सिजन लावून घेतले.

विशेष म्हणजे, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित दांपत्याची घरी येऊन चौकशी केल्यानंतरही वॉर रुममध्ये नोंदणी झालेली नसल्याने खाट मिळणार नाही, असे या दांपत्याला सांगण्यात आले.यातून ठाणे महापालिकेचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *