Fri. May 7th, 2021

अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्या

राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बाजारात त्यांची आवक घटली असून घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात २ ते ६ रुपयांनी, तर किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तर भाज्यांपाठोपाठ डाळींच्या दरातही वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

उन्हाच्या तीव्र झळांमुळे भाज्यांचे नुकसान होऊन त्याचे उत्पादन कमी प्रमाणात होत असते. त्यात, यंदा राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाशी, मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवकही कमी प्रमाणात होत आहे.

• घाऊक बाजारात पूर्वी ३० रुपये प्रति किलोने विकली जाणारी भेंडी सध्या ३४ रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
• ३८ रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी ४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे
• ४५ रुपये किलोने विकली जाणारी गवार सद्य:स्थितीत ५० रुपये किलोने विकली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *