Mon. Jul 13th, 2020

आरोपीचा टॉवरवर चढून धिंगाणा…

आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी चक्क एका आरोपी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या टॉवरवर चढून बसला. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. श्रावण राठोड असे या आरोपीचे नाव आहे.

नेमंक काय घडलं?

  • यवतमाळच्या लाडखेड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामटवाडा हे गाव आहे.
  • येथील आरोपी श्रावण राठोड याच्यावर कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
  • मात्र गुन्हा दाखल होऊनही या आरोपीला अटक करण्यात आलं नव्हतं.
  • या घटनेचा तपास ठाणेदार सारंग मिराशी करत होते.
  • आपल्यावरील गुन्हा खोटा असून दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, असा वाद आरोपी घालत होता.
  • मात्र एवढ्यावरच न थांबता हा आरोपी थेट पोलीस स्थानकाजवळच्या टॉवरवरच जाऊन चढला होता.
  • या आरोपीला खाली उतरवताना पोलिसांच्या अक्षरशः नाकी नऊ आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *